संगमनेर नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भूमिगत गटारांमध्ये २ कामगारांचा मृत्यू झाला असून यातील इतर जखमी व मृत कामगारांच्या नातेवाईकाची भेट घेऊन मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आस्थेवाईपणे चौकशी केली.

भूमिगत गटारांमधील दुर्घटनेची माहिती मिळतात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार मा.आ.डॉ.सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात आणि कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी तातडीने घटनेची माहिती घेऊन मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिलासा दिला. याचबरोबर डॉ.कुटे हॉस्पिटल मध्ये जाऊन जखमींची पाहणी केली तर कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी स्वतः स्टेटस्कोप घेऊन जखमींची तपासणी केली.



याप्रसंगी माजी आ.डॉ.तांबे म्हणाले की झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे.प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षितता व स्वच्छतेबाबत अधिक सतर्क राहिले पाहिजे.मात्र नगरपालिका प्रशासनातून सातत्याने निष्काळजीपणा होत आहे. तर डॉ.जयश्रीताई थोरात यांनी हॉस्पिटल मध्ये भेट देऊन स्वतःस्टेटस्कोप घेऊन जखमींची तपासणी केली. याचबरोबर. मृत व जखमींच्या नातेवाईकांना दिलासा दिला.
उपस्थित नागरिक म्हणाले की, नगरपालिका प्रशासनाकडून मागील तीन वर्षापासून प्रत्येक गोष्टींमध्ये निष्काळजीपणा होत आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक कोणीही पदावर नसल्याने प्रशासनावर जनतेचा धाक नाही. विविध प्रभागांमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे. अस्वच्छतेचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, गर्दीचा प्रश्न असे सर्व असताना कोणताही प्रश्न मांडण्यासाठी नगरसेवक नाही. नगरपालिकेमध्ये नगरसेवक असल्याने त्या त्या प्रभागातील प्रश्न तातडीने सोडवले जातात किंबहुना ते प्रशासनाच्या पाठीमागे लागतात त्यामुळे जनतेचा धाक त्यावर असतो मात्र मागील तीन वर्षापासून प्रशासनाच्या मर्जीनुसार काम चालू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
- निवृत्त सैनिक प्रकाश कोटकर यांची मोठी मदत

कोल्हेवाडी रोड येथे भूमिकेत गटारीचे काम चालू असताना ही दुर्घटना झाली. यावेळी निवृत्त सैनिक प्रकाश कोटकर हे त्या ठिकाणाहून जात होते. गर्दी पाहून ते थांबले. भूमिगत गटारामध्ये कामगार अडकला आहे. समजतात स्वतः कमरेला दोर बांधून ते खाली उतरले आणि या व्यक्तींना बाहेर काढले. यावेळी त्यांना किरकोळ दुखापत झाली मात्र सैनिकाने तातडीने बजावलेल्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.