चंदनापुरी घाट अपघात प्रकरण : ठेकेदार कंपनीवर कारवाई करा – आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी

  • स्कूल बस फिटनेसचे ऑडिट करा, अपघाताला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूलबस अपघातप्रकरणी जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. तसेच संपूर्ण राज्यातील सर्व शाळांच्या बसचे फिटनेस ऑडिट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या सभागृहात मांडत या अपघातांना कारणीभूत ठरलेल्या शंकर रामचंद्र इन्फ्रा कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे चंदनपुरी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच चंदनापुरी घाटात काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होते त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती, त्यामुळेच स्कूलबस पलटी होऊन अपघातात झाला होता त्यात १६ विद्यार्थी जखमी झाले होते, अपघातग्रस्त बसला परिवहन विभागाकडून परवानगी होती का असा सवाल उपस्थित करत त्याची चौकशी करा," अशी स्पष्ट मागणी करत आमदार खताळ यांनी सर्व स्कूल बसचे फिटनेस ऑडिट तातडीने करण्याचे मागणी राज्य सरकारकडे केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *