भाजप आणि विखे गटाला मोठं खिंडार, शेकडो कार्यकर्ते बाळासाहेब थोरातांसोबत

मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि विखे गटाला मोठे खिंडार पडले आहे.
अमृतवाहिनी सहकारी बँक येथे मालुंजे येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी समवेत कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक काँग्रेसचे शेखर सोसे ,सोसायटीचे व्हा.चेअरमन सुमित सोसे ,लहानू नागरे ,कल्पेश आव्हाड, योगेश जोशी, मल्हारी ईघे आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला असून आमदार थोरात यांनी कायम सर्वधर्मसमभाव जोपासत गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले आहे. त्यामुळे जनसेवा मंडळाच्या राजेंद्र आव्हाड, संपत सोसे, संदीप डोंगरे, प्रकाश खरात,संजय साठे, भाऊसाहेब खरात, वैभव सोसे, साहेबराव सोसे,रमेश पिंपळे, सोमनाथ पिंपळे,संतोष घुगे, भिकाजी भागा घुगे, प्रवीण गाडेकर, गोविंद सोसे यांच्यासह शेकडो युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून प्रत्येक गावात आणि वाडी वस्तीवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या योजना राबवल्या आहेत. संगमनेर तालुका सुसंस्कृत आणि पुरोगामी विचारांचा तालुका आहे येथे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि म्हणून जनसेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक आहेत .यापुढेही अनेक लोक काँग्रेस पक्षात येणार आहेत.मालुंजे येथील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने विखे गटाला मोठे खिंडार पडले आहे असं संतोष नागरे यांनी म्हटलंय.
या सर्व नवीन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ सुधीर तांबे ,कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात,तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे,सुरेश थोरात,राजेंद्र चकोर, विक्रम थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *