आदर्श सायकल पटू स्व.डॉ संजय काळे यांचे स्मरणार्थ अग्नीपंख फौंडेशनने पहिला राज्यस्तरीय प्रेरणा सायकल पटू पुरस्कार संगमनेर येथील राष्ट्रीय सायकल पटू प्रणिता सोमन तसेच भाऊसाहेब वाघ (दौड) सिध्दार्थ सोनवणे (श्रीगोंदा) यांना प्रदान केला आहे.

पारगाव सुद्रिक येथे रविवारी डॉ संजय काळे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून हे पुरस्कार भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते दिग्विजय नागवडे सुदाम पवार प्रा संजय लाकूडझोडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले विक्रमसिंह पाचपुते दिग्विजय नागवडे यांनी अग्नीपंख फौंडेशन सायकल क्षेत्रात डॉ संजय काळे यांचे नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आणि पुरस्कार्थींची योग्य निवड केली. राष्ट्रीय सायकल पटू प्रणिता सोमन म्हणाली की, सायकल क्षेत्र हे व्यायाम आणि स्पर्धा करिअर च्या दृष्टीने महत्वाचे आहे इतर सायकल पटूंना उत्तेजन मिळावे या भावनेने अग्नीपंख फौंडेशन नेऊन प्रेरणा सायकल पुरस्कार देण्याचा चांगला निर्णय घेतला पहिल्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड त्याबद्दल मी ऋणी आहे. यावेळी पारनेरचे माजी सभापती सुदाम पवार माऊली हिरवे शशीकांत जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब शेलार पोपटराव खेतमाळीस प्रशांत गोरे नवनाथ खामकर धीरज डांगे नवनाथ दरेकर दिलीप काटे भाऊसाहेब खेतमाळीस राजेंद्र गांधी विशाल चव्हाण मारुती डाके प्रशांत एरंडे दत्ता इलतिका वाबळे अॅड कावेरी गुरसल रेखा डोंगरे उपस्थित होते. सुत्रसंचलन दत्तात्रय पाचपुते यांनी केले. यावेळी रक्तदान शिबीर घेतले यात 35 जणांनी रक्तदान केले.
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी
गणेश कविटकर