खबरीलालचा राजकीय कडेलोट करा – खा. निलेश लंके

आमदार बाळासाहेब थोरात यांची सुसंस्कृत नेता म्हणून राज्याला ओळख आहे. दडपशाही करणाऱ्यांना आम्ही दक्षिणेत झटका दिला आहे. वाघाची झुल मांजराने अंगावर घेतल्याने कोणी वाघ होत नाही. तो टायगर नव्हता.खरा टायगर हा संगमनेर मध्ये असून येत्या विधानसभेत संगमनेर मधील खबरीलालचा राजकीय कडेलोट करा असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले असून दोन लाखाच्या मताधिक्याने आमदार थोरात यांना विजयी करा असे म्हटले आहे.

युवक काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने तळेगाव दिघे येथे झालेल्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, माधवराव कानवडे, रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, सचिन दिघे, सुभाष सांगळे, सचिन खेमनर, हर्षल राहणे, निखिल पापडेजा, वैष्णव मुर्तडक अजून सह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खासदार लंके म्हणाले की, संगमनेर तालुक्यात संस्कृती आहे तर शेजारी राहता तालुक्यात दडपशाही आहे. विकास आणि गोरगरिबांचे कामे करून आमदार थोरात यांनी हा तालुका निर्माण केला आहे. नगर दक्षिणेमध्ये त्यांना मोठा झटका दिला आहे. संगमनेर हे तर आमदार थोरात यांचे होमपिच आहे. संगमनेरचा वाघ राज्यात गर्जना करतो आहे. आणि राहता मतदार संघाच्या बाहेर यांना पडता येत नाही. आता त्यांचे कायमचेच ग्रहमान फिरले आहे.या तालुक्यांमध्ये तोतया खबरीलाल आहे. या खबरीलालचा राजकीय कडेलोट करून आमदार बाळासाहेब थोरात यांना दोन लाखांच्या मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.तर डॉ.अमोल कोल्हे म्हणाले की, आमदार आणि मंत्री खरेदी करण्याची सुरुवात मागील अडीच वर्षापासून झाली आहे. भाजपाने जातीच्या नावावर राजकारण केले आहे. निवडणुकीसाठी विविध जुमले सुरू केले आहे. माता भगिनी असुरक्षित आहेत. स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनतेने गद्दारांना जागा दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.तर माजी मंत्री देशमुख म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आदर्श नेतृत्वाचा वारसा जपला आहे. सततच्या कामातून तालुका उभा केला आहे. या तालुक्याची ओळख संपूर्ण राज्याला असून संगमनेर सर्वाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन केले.तर आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरणासाठी आपण काम केले. कालवे पूर्ण केले. ज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला परंतु जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आगामी काळामध्ये कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी देण्यासाठी योजना राबवल्या जातील असे ते म्हणाले.तर खासदार भाऊसाहेब व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *