तनपुरेंना धक्का, घोरपडवाडीच्या ग्रामपंचायत सदस्याचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गटातील घोरपडवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य दत्तू जालिंदर शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात तनपुरेंसाठी हा मोठा राजकीय धक्का असून महायुतीची ताकद वाढण्यास मदत झाली आहे. शिंदे यांच्यासह तात्यासाहेब बाचकर, गंगा बाचकर, दत्तू येळे, रामदास बाचकर, रवींद्र शेंडगे, गोविंद शेंडगे, रवींद्र हापसे, नितीन करमड, योगेश करमड, राहुल हापसे, भारत हापसे, अजय हापसे, रमेश थोरात, हनुमंता हापसे, राहुल थोरात, लहू बाचकर, अमोल बाचकर, सत्यवान शिंदे, सचिन हापसे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *