अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचा शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर

राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे यांनी कर्डिले यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. कर्डिले यांनी नेहमीच समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी योगदान दिले आहे. भविष्यातही ते कायम सहकार्य करतील असा विश्वास खरारे यांनी व्यक्त केला.

यावेळी संघटनेचे जगदीश कुडिया, रवी गोहेर, सुमित गोहेर, राहुल लखन, गोविंद घोडके, धीरज बैद, जगबीर चौहान, दीपक नकवाल, प्रशांत पाटोळे, संतोष सारसर, विकास पंडित, शुभम टाक, आकाश कुडिया, नरेश चव्हाण, सचिन वाल्मिकी, मनोज बागडी, सूरज जंगार, प्रदीप जंगार, प्रमोद चव्हाण, अतुल भुलैया, विजय डिडिरे, कृष्णा चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *