गोविंद मोकाटे समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश, शिवाजी कर्डिलेंना पाठिंबा

नगर तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्या निकटच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राहुरी मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी शरद टिमकरे, रवी टिमकरे, बापू टीमकरे, राहुल टिमकरे, भद्रीनाथ टिमकरे, उदय आवारे, धोंडीराम मोकाटे, शरद सुंबे आदी उपस्थित होते. मोकाटे समर्थकांच्या भाजप प्रवेशामुळे जेऊर गटात कर्डिलेंची ताकद आणखी वाढली आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आ.प्राजक्त तनपुरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत असून अनेक समर्थक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *