महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीमध्ये नेहमीच मोलाचा वाटा उचललेला आहे. आत्तापर्यंत महाविद्यालयातून २४११ विद्यार्थ्यांनी एमबीए पदवी संपादित केलेले असून अशा या एमबीए महाविद्यालयाची स्थापना सहकारातील दूरदृष्टी नेतृत्व असलेले सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून इसवी सन १९९४-१९९५ मध्ये झाली. त्यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आतापर्यंत दैदीप्यमान यश संपादन केलेले आहे.त्यामध्ये महाविद्यालयात उत्कृष्ट निकालाची परंपरा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार, कॉन्फरन्सचे आयोजन तसेच नवीन उद्योजक घडवण्याचे कार्य केलेले आहे.

अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात उच्च निकालाची परंपरा राखली आहे. त्यामध्ये महाविद्यालयाने आयएसओ मानांकनही प्राप्त केलेले असून सन २०२४ मध्ये महाविद्यालयाने यूजीसी नॅकचे “ए” ग्रेड मानांकन मिळवलेले आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधनेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबरच व सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. त्यापैकीच कॅम्पस प्लेसमेंट हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यावर्षी १८ नोव्हेंबर २०२४ मध्ये महाविद्यालयात होमसफाय या कंपनीने कॅम्पस इंटरव्यू आयोजित केला. त्यामध्ये एमवीए महाविद्यालयातील वेदांत कहाणे साईनाथ भालेराव व अवंतिका गाडेकर या तीन विद्यार्थ्यांची वार्षिक ७ लाख या पॅकेजवर निवड झाली असल्याची माहिती अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी.एम लोंढे यांनी दिली.अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात केवळ पाठ्यक्रम अभ्यासक्रम न शिकविता विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात तसेच नव उद्योजक निर्माण करण्याचे काम केले जाते.या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी अमृतवाहिनी एमवीएच्या वतीने संचालक डॉ. बी.एम. लोंढे प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. एन एस भांड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या सर्व निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अमृतवाहिनी संस्थेचे अध्यक्ष मा .आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त माजी पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, साखर कारखान्याचे संचालक श्री इंद्रजीत भाऊ थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, व्यवस्थापक श्री व्ही. बी. धुमाळ, आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ. जे.बी. गुरव या सर्वानी एमबीए महाविद्यालयाच्या सर्व स्टाफचे अभिनंदन केले.