संगमनेर शहराजवळील गुंजाळवाडीच्या अरगडे मळ्यातील शारदा सोपान अरगडे यांचं आज शुक्रवारी १७ जानेवारीला दुपारी दुःखद निधन झालं, एक संयमी, शांत आणि मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून शारदा अरगडे यांची ओळख होती.

त्यांच्या अकाली निधनाने अरगडे मळा प[परिसर आणि संपूर्ण कुटुंब, नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कै. सौ. शारदा सोपान अरगडे यांच्यावर दुपारी साडेतीन वाजता संगमनेर शहरातील प्रवरातीरी (मोठ्या पुलाजवळ) अंत्यसंस्कार होणार आहेत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. कै. सौ. शारदा सोपान अरगडे यांच्या पश्चात सासू, पती, २ मुले, १ मुलगी, सून, नातू असा परिवार आहे.