झाड अंगावर पडून शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा मृत्यू

अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे वादळ-वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रोडला झाड अंगावर पडून शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा मृत्यू झालाय.


बुधवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान पावसाचे वातावरण झाल्यामुळे शेतात असणारे कांदे झाकण्यासाठी आपल्या मोटारसायकलवरून सुनेसह शिवाजी वाकचौरे हे जात होते. वादळ सुटल्याने जोरदार वाऱ्याने कोल्हार घोटी मार्गालगत असणारे महारुकचे मोठे झाड त्यांच्या अंगावर पडले. सुदैवाने सुनेला काही झाले नाही मात्र त्यात शिवाजी वाकचौरे यांना डोक्याला मार लागला त्यांना संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर उपचारादरम्यानच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
कळस येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचे पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *