अमेरिकेत होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी आदित्य कडलग यांची निवड

टाटा एआयए लाईफ इ्शुरन्स कंपनीचे अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांना जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त झाल्यामुळे त्यांना ७ ते १० जून २०२६ रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील अनाहिम येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. पदार्पणातच २०२३ ला एमडीआरटी, २०२४ ला एकाच वर्षात तीन वेळा एमडीआरटी मानांकन प्राप्त केल्याने जागतिक पातळीवरील प्रतिष्ठेचे सीओटी अवॉर्ड आणि यावर्षी केवळ चारच महिन्यात पहिले एमडीआरटी मानांकन आदित्यने प्राप्त केले आहे.

आदित्य यास एमडीआरटी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, प्रेरणादायी वक्ते व कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांच्यापासून प्रेरणा मिळाली . सुनील कडलग हे गेल्या २९ वर्षापासून जीवन विमा सल्लागार, १६ वर्षांपासून म्युच्युअल फंड वितरक व आरोग्य विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अतिशय पारदर्शक व प्रामाणिक सेवा व कार्य केले आहे. कोविड महामारीच्या दरम्यान कडलग यांनी अनेक कुटुंबांना विमा मृत्यू दावे प्राप्त करून दिलेले आहेत. आरोग्य विम्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना कोविड क्लेम प्राप्त करून देऊन आधार दिलेला आहे . समाजामध्ये अर्थसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्रभर ते व्याख्याने देतात आणि वृत्तपत्रांमधून लेखनही करतात. जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक कार्यवाह , संगमनेर येथील रोटरी आय केअर ट्रस्टचे माजी विश्वस्त, रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे संचालक अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सुनील कडलग हे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. जागतिक विमा परिषदेसाठी पात्र होण्यासाठी आदित्य कडलग यास टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनी नाशिकचे शाखाधिकारी धनंजय पाटील , चीफ बिझनेस असोसिएट सुरज वानखेडे, सामजिक कार्यकर्ते व कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग, आई उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांचे मार्गदर्शन लाभले आहे . आदित्य कडलग यांनी २०२३ मध्ये जीवन विमा या क्षेत्रात पदार्पण केले आहे .

आदित्य यास हा बहुमान प्राप्त झाल्याने कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढी या क्षेत्रात प्रभावीपणे व सातत्यपूर्ण कार्यरत असल्याचा संदेश दिला गेला आहे. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून कडलग इन्व्हेस्टमेंटने अनेक ग्राहकांच्या जीवनात संपत्ती निर्माण केली आहे. आदित्य कडलग हे सुद्धा म्युच्युअल फंड वितरक म्हणून कार्यरत आहेत. संगमनेर शहरातील जागतिक विमा क्षेत्रातील पहिले सीओटी आणि सातत्यपूर्ण एमडीआरटी म्हणून आदित्यच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *