तुमच्या गावामध्ये जे काही विनाकारण कार्यकर्त्यांना त्रास देत होते त्यांचा तुम्ही बंदोबस्त करण्याचे काम चांगले केले आहे, यावरही तुम्हाला काही जण भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना अजिबात घाबरू नका तुमचा भाऊ या नात्याने मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी घुलेवाडीच्या शिवसैनिकांना दिला.


संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शिंदे शिवसेना शाखेचा शुभारंभ आ. अमोल खताळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी घुलेवाडी शिवसेना शाखा अध्यक्ष शरद पानसरे, उपाध्यक्ष वैभव राऊत, सूरज राऊत, कार्याध्यक्ष नितीन राऊत, सचिव ओंकार काळे, खजिनदार सौरभ राऊत, विजय घुले, संघटक दुर्गेश वाळुंज, ऋषिकेश राऊत, स्वरूप राऊत, स्वप्निल राऊत, संजय पानसरे, रोशन कोथमीरे, गणेश राऊत, कैलास काशीद, भिकाजी राऊत, सोपान राऊत, सिताराम पानसरे, विनायक वाडेकर, प्रशांत राऊत, सुनील राऊत, ओंकार राऊत, सिद्धार्थ तुरकणे, सतीश भेंडाळे, सारंग पानसरे, निखिल कोटकर, आकाश सोनवणे, संकेत राऊत, प्रज्ञा शिंदे, सचिन गिरी, सुहास गोडसे, सोमनाथ साकला राऊत, सोमनाथ सातपुते, अक्षय राऊत, तुषार कांबळे, किरण राऊत, कृष्णा राऊत, संघर्ष घोलप, आकाश वाकचौरे, बाबु राऊत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत जसे तुम्ही सर्व युवाशक्ती, मायबाप जनतेने, तालुक्यात परिवर्तन केले असेच परिवर्तन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकित आपणा सर्वांना भगवा फडकवायचा आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी कामाला लागावे . तुम्हाला गावात कोणी दादागिरी करत असेल तर त्याचा बंदोबस्त करू अशा स्वयंघोषित दादांना अजिबात घाबरू नका. तुम्हाला त्यांनी किती ही भीती दाखवली तरी त्यांचा शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार खताळ यांनी शिवसैनिकांना देऊन तुम्ही घुलेवाडी शिवसेनेचे संघटन मजबूत करा असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.