ज्यांनी कधी राजकारणाचा अभ्यास केला नाही, राजकारण काय असते हे त्यांना माहीत नाही असे पात्रता नसलेले तसेच आपला व्यवसाय टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे पदवीधर आमदारांचे स्वयंघोषित पुढारी जर सर्व सामान्याचे काम करणाऱ्या आमदारांवरती टीका करून स्वताचे हसू करून घेत आहेत. त्यांच्याकडे जर खरी नैतिकता असेल तर त्यांनी आ.अमोल खताळ यांच्यावर टिका करण्यापेक्षा न केलेल्या कामाबद्दल संगमनेरच्या सर्वसामान्य जनतेची माफी मागावी जळजळीत टीका माजी उपनगराध्यक्ष आणि भाजप नेते जावेद जागीरदार यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी उपनगराध्यक्ष जावेद जागीरदार म्हणाले की संगमनेर नगरपालिकेत गेली 30 वर्षा पासून आपल्या मामांची एकहाती सत्ता असताना तसेच आपली आई सन २००८ पासून नगराध्यक्ष असताना सन २००८ मध्ये 2 % शास्तीकर आणि अनाधिकृत बांधकामा वरील शास्ती बाबतचा ठराव सभागृहात मंजूर करून संपूर्ण जिल्ह्यात फक्त संगमनेर नगर परिषदेत शास्ती लावली जात होती. आपल्या मातोश्री २०२१ पर्यंत नगराध्यक्ष असताना त्यावर आपण एक शब्दही कधी बोलले नाही. तुमचे मामा महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री असताना व आपले वडील पदवीधर मतदारसंघाचे आमदार असताना त्यांनी कधीच विधान विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात या अन्यायकारक घरपट्टी वरील शास्ती व अनाधिकृत बांधकामा वरील शास्ती बद्दल एक शब्दही काढला नाही उलट अन्यायकारक घरपट्टी वसुली साठी लोकांवर सरकारी यंत्रणेचा वापर करून नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले मालमत्ता सील करून जप्त करण्यात येऊन वसुली सुरू केली . त्यामुळे तुमचे मामा आई आणि वडील यांच्या जुलमी कारभाराला कंटाळून संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेचा आवाज उठवणारे सर्वसामान्यांचे आमदार म्हणून अमोल खताळ यांना निवडून दिले . तसेच 40 वर्षात न सुटलेले सर्वसामान्य जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न तसेच संगमनेर शहरा तील शास्तीकरासंदर्भातील मुद्दा विधान सभेमध्ये उपस्थित केला त्यामुळे तुमच्या पोटात दुखायला लागले आहे . आपण केलेले पाप उघड होऊ नये म्हणून न केले ल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी आपली व आपल्या बगलबच्च्यांची धडपड सुरू झाली. हे सर्व संगमनेर शहरातील सुज्ञ जनतेला माहित आहे अन्यायकारक शास्ती लावणारे संगमनेर नगरपालिकेत सत्ता असताना सर्वात जास्त घरपट्टी दर लावणारे आपणच म्हणून या शहरातील सर्वसामान्य जनतेने तुम्हाला धडा शिकवला असल्याची टीका जहागीरदार यांनी केली आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी नसलेले पाच जिल्ह्याच्या तालुक्यातील पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून देत संगमनेरातच लुडबुड का करतात असा सवाल उपस्थित करत या पदवीधर मतदार संघातील पाचही जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदवीधरांचे प्रश्न ते कधी विधान परिषदेत मांडणार असा सवाल संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने उपस्थित केला आहे यापाठीमागे त्यांच्याच घराणेशाहीचे राजकारण असल्याचे दिसत आहे त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडून मार्गी लावत आहे हे त्यांना देखवत नाही अशी टीका जावेद जहागीरदार यांनी केली आहे