संगमनेर शहर आणि तालुक्यातील वीजपुरवठा नियमित सुरळीत राहावा यासाठी आमदार अमोल खताळ हे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. आणि गरज असल्यास बैठका घेऊन स्थानिक समस्यांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. जनतेच्या अडचणी दूर करणं, संवादाच्या माध्यमातून मार्ग काढणं ही त्यांची कार्य पद्धती आहे. पण जनतेमध्ये खोटी अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा तुमचा केविलवणा प्रयत्न काँग्रेस पक्षा च्या माजी नगराध्यक्षाकडून होत आहे असा गंभीर आरोप आ.अमोल खताळ समर्थक भाजप नेते राहुल भोईर यांनी केला आहे.

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार अमोल खताळ हे जबाबदारीने अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करत आहे मात्र काहींना ते पहावत नाही त्यामुळे ते “शॉर्टकट” सापडत आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. जनतेमध्ये ठिय्या आंदोलनाच्या अफवा पसरवून आपण फक्त आपल्या 10 वर्षाच्या असमर्थतेचेच दर्शन घडवत आहात. खोट्या बातम्या पेरून जनतेचा विश्वास मिळवता येत नाही त्यासाठी निष्ठा, काम आणि वास्तवात केलेली सेवा लागते .”स्वतःकडे सत्ता असताना काही काम केलं नाही, आता बाहेरून इतरांना काम करायचं सांगणं” हे राजकारण नव्हे, तर ‘सत्तेची झोप’ म्हणतात ! आपण नगराध्यक्ष म्हणून पदावर असताना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कुठलाही प्रयत्न केल्याचे कधीच दिसले नाही. कामावर लक्ष न देता टीका करणं सोपं आहे.
आमचे आमदार निदान प्रयत्न तरी करत आहेत, तुमच्यासारखे गप गुमान खुर्चीवर बसून ‘घोटाळ्यांचा दिवा’ लावत नाही बसले. ४० वर्षं सत्ता होती, पण ना ट्रान्सफॉर्मर लावले, ना वायरिंगची कामं केली आणि आता शिकवायला येता? विजेची अडचण तुमच्या भ्रष्ट आणि आळशी कारभाराची देण आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्यांना आता उत्तर मिळतंय. विकास होत असल्यानं पेटले आहेत, पण कितीही पेटलात, तरी जनतेचं प्रेम विजेसारखंच अखंड आहे आणि आमदारांच्या पाठिशी ठाम उभं आहे असे भोईर यांनी यावेळी सांगितले.