संगमनेर तालुक्यातील खांबा गावच्या उपसा सिंचन योजनेसाठी जलसंपदा मंत्री विखेंचा महत्वपूर्ण निर्णय

तालुक्यातील खांबे येथील कामधेनू सहकारी उपसा सिंचन योजनेसाठी आ.अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून जॅकवेल घेण्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिल्याचे पत्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः येवून ग्रामस्थांकडे सुपूर्द केले.जलसंपदाच्या निर्णायमुळे खांबा गावाच्या पाणी प्रश्नातील मोठा अडथळा दूर झाला आहे.


खांबा गावाला वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी प्रश्न सुटावा म्हणून ग्रामस्थांनी आग्रही मागणी मंत्री विखे पाटील यांच्याकडे विधानसभा निवडणुकीपुर्वी केली होती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आ.अमोल खताळ यांनी या मागणीचा पाठपुरावा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे केल्यानंतर जलसंपदा विभागाने सादर झालेल्या प्रस्तावाला शर्थी आणि अटी टाकून म्हैसगाव तास या पुलापासून मुळा धरणाच्या बुडीत क्षेत्रात साधारणपणे ५० ते ७५ मीटर अंतरावर मुळा धरणाच्या भिंतीपासून २२ कि.मी. अंतरावर ३ गुंठे जागा जॅकवेल अप्रोच ब्रीज व पंप हाऊसचे काम करण्यासाठी जलसंधारण विभागास ना हरकत पत्र दिल्याने गावासाठी स्वतंत्र जॅकवेल घेण्याची मोठी अडचण दूर झाली आहे.


खांबा गावाचा पाणी प्रश्न सोडविणार आशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी गावात झालेल्या कार्यक्रमात दिली होती. आ. अमोल खताळ यांनी यासाठी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. रविवारी मंत्री विखे पाटील आणि आ. अमोल खताळ, कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या उपस्थितीत खांबा गावचे सरपंच रविंद्र दातीर आणि ग्रामस्थांना हे पत्र सुपूर्द करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पाणी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्याची सुरूवात झाली आहे. अजून या प्रश्नावर खूप काम करायचे असून जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने दिलेल्या आश्वासनाची नक्की पूर्तता होईल अशी प्रतिक्रीया आ. अमोल खताळ यांनी व्यक्त केलीये.


सरपंच रविंद्र दातीर यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या सहकार्याने खांबे गावाला मोठा दिलासा मिळाला असून लवकर जॅकवेल आणि पंप हाऊसचे काम करून गावासाठी पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *