जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतर होणार – आ. अमोल खताळ

संगमनेर तालुक्यातील मौजे जांभुळवाडी व मौजे साकूर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत असल्या तरी महसुली सजा एकच असल्याने जांभुळवाडीचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण करण्याची नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची जुनी मागणी होती. महसुली सजा स्वतंत्र नसल्याने अनेक प्रशासकीय अडचणी येत होत्या. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण केल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. तसेच सदर अधिसुचना अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रसिद्ध केली आहे.


या निर्णयामुळे साकूर या महसुली गावांची साकूर व जांभुळवाडी या दोन स्वतंत्र महसुली गावांत विभागणी झाली असुन जांभुळवाडी या गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळणार आहे. तसेच जांभुळवाडी हद्दीतील साकूरमध्ये समाविष्ट असलेले भुमापन क्रमांक वगळुन नव्याने जांभुळवाडीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
या निर्णयाचे जांभुळवाडी परिसरातुन मोठ्या प्रमाणात स्वागत होत असुन 40 वर्षांचा प्रश्न 100 दिवसांत मार्गी लावल्याने पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर, बुवाजी पा.खेमनर, भाजपा अध्यक्ष गुलाबराजे भोसले, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, मच्छिंद्र खेमनर, युवराज खेमनर, नागेश कोळेकर, संतोष खेमनर, मन्सुर पटेल, बाळासाहेब दिनकर खेमनर यांसह कार्यकर्ते व नागरिकांनी आमदार अमोल खताळ व पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *