अहिल्यानगरचे जिल्हा उपनिबंधक म्हणुन मंगेश सुरवसे यांनी पदभार स्वीकारला, स्वाभिमानी सचिव संघटनेकडून सत्कार

अहिल्यानगर – सहकाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहिल्यानगरच्या जिल्हा उपनिबंधकपदी मंगेश सुरवसे यांनी पदभार स्वीकारला आहे. साखर कारखाना, पतसंस्था, सेवा सोसायटी, जिल्हा बँक, शेड्युल बॅक अशा विविध सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अग्रगण्य असलेल्या नगर जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधकपदी गणेश पुरी यांनी जवळपास ४ वर्ष कामकाज पाहिले. त्यांची प्रशासकीय बदली मुंबई येथे मंत्रालयात झाल्याने सांगली येथुन बदली झालेल्या सुरवसे यांनी शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी स्वाभिमानी सचिव संघटनेचे राज्य अध्यक्ष गणेश रेवगडे, कार्याध्यक्ष संतोष कळमकर, सरचिटणीस रावसाहेब सोनार, खजिनदार मंगेश देशमुख, गणेश पाचपुते व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरवसे यांचा सत्कार केला. यावेळी नगर जिल्ह्यात लवकरच होणाऱ्या राज्यस्तरीय सचिव महाअधिवेशना विषयी चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *