मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका हा एक परिवार म्हणून राहिला. मात्र काही लोक राजकारणासाठी समाजात तेढ निर्माण करत असून यंग नॅशनल ग्राउंडच्या विकास कामासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून एक कोटी रुपयांचा निधी मिळाला. काम सुरू झाल्यानंतर मात्र हे काम कोणी रोखले हे सर्वांना माहीत आहे असे अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद शेख यांनी म्हटले आहे.

जावेद शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या विभागाच्या विकासाकरता सातत्याने विविध योजना राबवल्या गेल्या. एसटीपी प्लांट ची जागा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बदलवली. याबाबत अनेक अफवा आणि चुकीचे गैरसमज निर्माण केले. सर्व जनता आपली आहे. या हेतूने येथील नेतृत्व काम करत आहे. मात्र काही लोक यामध्ये तेढ निर्माण करत आहे.
यंग नॅशनल ग्राउंड हे मध्यवर्ती ठिकाणी असून या ग्राउंडच्या विकासाकरता आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करून एक कोटी रुपयांचा निधी मिळवला. कामही सुरू केले. मात्र महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर फक्त राजकारणासाठी हे काम रोखले गेले. हे सर्व तरुणांना माहीत आहे. त्यामुळे कोणी या भागांमध्ये येऊन भूलथापा देऊ नये. असे सांगताना नवीन लोकप्रतिनिधीने नवीन निधी आणावा आणि कामे करावी.
संगमनेर नगरपालिकेने स्वच्छता आणि विकास कामांमधून राज्यात आपला लौकिक निर्माण केला आहे. हे सर्वश्रुत आहे आणि त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपा प्रणित सरकार असताना सुद्धा वेळोवेळी नगरपालिकेला स्वच्छतेची अनेक पारितोषिक मिळाली आहे. स्वच्छतेबाबत नगरपालिकेला 10 कोटींची बक्षिसे मिळाली आहे. मात्र मागील तीन वर्षापासून महायुतीतील सत्ताधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन काम करत असून संगमनेर मध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
स्वच्छ व सुंदर शहर असणाऱ्या संगमनेरचा लौकिक या अस्वच्छतेमुळे कमी होणार असून या अस्वच्छतेमुळे नागरिक वैतागले आहे. याबाबत अधिक सतर्कतेने काम करण्यासाठी विविध प्रभागांमधील सर्वपक्षीय नागरिकांनी नगरपालिकेला सुचवले आहे. यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी ही स्वच्छता तातडीने करावी यासाठी प्रशासनाला सूचना करायला पाहिजे. कारण जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. डासांचे प्रमाण वाढले घंटागाडी वेळेवर येत नाही. असे असताना यावरून राजकारण करणे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
संगमनेरचा आज राज्यामध्ये जो लौकिक आहे तो सर्व चांगल्या कामामुळे आहे. त्यामुळे राजकारणासाठी काहीही आरोप करणे हे अत्यंत चुकीचे असून संगमनेरची ही परंपरा नाही. चुकीच्या भूलथापा देऊन जनतेच्या मनात गैरसमज निर्माण करू नये असेही शेख यांनी म्हटले आहे.