भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त आयोजित शोभा यात्रेत आमदार अमोल खताळ यांचा सहभाग

संगमनेर शहरातील राजस्थानी ब्राह्मण समाज आणि जगदीश मंदिर ट्रस्टच्यावतीने भगवान जगन्नाथ रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या या शोभायात्रेने संपूर्ण शहरात धार्मिक उत्साह व एकात्मतेचे वातावरण निर्माण केले. या शोभायात्रेमध्ये प्रथमच आ. अमोल खताळ यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय सहभागी होत भगवान जगन्नाथाची पूजा-आरती करून कृपाशीर्वाद घेतला.


संगमनेर शहरातील कॅप्टन लक्ष्मी चौक येथील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या भगवान जगन्नाथ मंदिरापासून या शोभा यात्रेला शुभारंभ झाला. ही शोभायात्रा बाजारपेठ, नगरपालिका, मेनरोड मार्गे बालाजी मंदिर ते श्रीकृष्ण मंदिरापर्यंत नेण्यात आली. श्रीकृष्ण मंदिर येथे आमदार अमोल खताळ यांच्यावतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. येथे त्यांनी रथाचे स्वागत करत समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

  • संगमनेर शहरातील धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा जपणारे असे उत्सव समाजात एकात्मता आणि संस्कृतीची निर्माण करतात. हीच खरी आपली ओळख आहे – आमदार अमोल खताळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *