अकोले तालुक्यातील अगस्ती ऋषी आश्रम, अकोले ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना रेनकोट वाटप करून डॉ. विश्वासराव आरोटे यांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या कार्याबद्दल पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.


अकोले तालुक्यातून विठ्ठल भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असताना, नगर तालुक्यातील दहेगाव येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली रेनकोट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले, विश्वस्त ह.भ.प. दीपक महाराज देशमुख, गणेश महाराज वाकचौरे, ह.भ.प. रमेश महाराज भोर यांची उपस्थिती लाभली.
डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. अगस्ती देवस्थानतर्फे अतिशय सुंदर नियोजन करून हा सोहळा पार पडतो, आणि अशा पवित्र कार्यात आम्ही पत्रकार सदैव मदतीसाठी सज्ज आहोत.”
या उपक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, राज्य समन्वयक संजय फुलसुंदर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईकवाडी मामा, उद्योजक राहुल पाबळकर, अहिल्यानगर जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. ओंकार शेदुरकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.
हा उपक्रम पालखी सोहळ्याच्या सेवाभावनेचा आणि सामाजिक जबाबदारीचा आदर्श ठरत आहे.