संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी आपण सातत्याने काम केले. निळवंडेमुळे उंचीवरील भागातून कालवे घेता आल्याने दुष्काळी भागामध्ये पाणी आले आहे. कालव्यांच्या वरच्या बाजूचे शेतकरी जे बाकी आहे त्यांनाही पाणी देण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा असल्याचे प्रतिपादन मा. महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. तर सत्तेसाठी अनेक जण पक्ष बदलतात मात्र विचारांवर आणि पक्षावर निष्ठा असलेले आणि सातत्याने जनतेच्या कामात रममन असणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील आदर्शवत नेतृत्व असून ते समाजकारणातील खरे हिरो असल्याचे गौरवउद्गार सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले आहे.

चिंचोली गुरव येथे पूर्व भाग सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी व देवराईच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खा.भाऊसाहेब वाकचौरे,सौ दुर्गाताई तांबे,गणपतराव सांगळे, जि प सदस्य महेंद्र गोडगे,संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, नवनाथ आरगडे, भारत शेठ मुंगसे, सुभाष सांगळे, सचिन दिघे,सरपंच विलास अण्णा सोनवणे, विलास मास्तर सोनवणे, अंकुश ताजने,योगेश भालेराव, अनिल कांदळकर, रामनाथ कुटे, पप्पू गोडगे, विजय गोडगे, चेअरमन अशोकराव गोडगे, व्हा चेअरमन विठ्ठल मेढे, योगेश सोनवणे, राजेंद्र कहांडळ, वाल्मीक गोडगे, आदींसह सोसायटी चे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







यावेळी देवराई फाउंडेशन व चिंचोली गुरव ग्रामस्थ यांच्यावतीने चिंचोली गुरव मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
तर सिने अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, आज सत्तेसाठी अनेकजण पक्ष बदलत आहे . कोण कोणत्या पक्षात आहे ते कळत नाही. परंतु विचारांवर असलेली निष्ठा आणि जनतेसाठीची तळमळ, व जनतेसाठी सातत्याने काम करणारे महाराष्ट्रातील आदर्श व्यक्तिमत्व असलेले बाळासाहेब थोरात हे राजकारणातील व समाजकारणातील खरे हिरो आहे. अशा नेतृत्वाचा प्रत्येकाला अभिमान पाहिजे. त्यांचा विविध क्षेत्राशी संपर्क असून त्यांनी कायम कलाकारांसह सर्वांना प्रतिष्ठान आणि सन्मान दिला आहे. वृक्षरोपणामध्ये संगमनेर तालुका हा पुढे आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या वयोमानाइतकी वृक्ष रोपण केले पाहिजे. याचबरोबर देशी वृक्ष ही ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देत असून चांगला श्वास घेणारा हा सर्वात श्रीमंत माणूस असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि निळवंडे धरणाची जागा निश्चित करण्यात आली. त्यामुळे उंचीवरून कालवे येऊन या परिसरामध्ये पाणी आले. कारखान्याच्या यंत्रणेच्या मदतीने पाणी आल्याने समृद्धी आहे. या परिसरा करता आपण सतत विकास कामे केली आहे, गावाच्या कामांसाठी निधी दिला आहे, विविध रस्ते पूर्ण झाले आहेत. साखळी बंधारे निर्माण झाले आहे. जे शेतकरी निळवंडे च्या पाण्यापासून वंचित आहे. त्यांना पाणी देण्यासाठी आराखडा पूर्ण करण्यात आला आहे. हे पाणी देण्यासाठी आपलाच पाठपुरावा राहणार आहे. शेतकऱ्यांचे कष्ट आणि विकास कामे यातून समृद्धी दिसत आहे. सेवा सोसायटीची मोठी वैभवशाली इमारत चिंचोली गुरव मध्ये निर्माण झाली आहे. चिंचोली गुरव च्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांकरता देव नदीचे पाणी या भागात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले.
तर सयाजी शिंदे यांनी मराठी हिंदी मल्याळम तेलगू अशा विविध भाषांमध्ये चित्रपट केले असून मराठी माणूस हा राष्ट्रीय पातळीवर काम करतो हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.
तर महेंद्र गोडगे म्हणाले की, निळवंडे चे पाणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच आले असून पाणी गावात आणण्याकरता थोरात कारखान्याच्या यंत्रणेची मोठी मदत झाली. झालेली विकास कामे ही सहा महिन्यात नाही तर माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक दिवसांच्या परिश्रमातून झाली आहे कोणीही या कामाचे श्रेय घेऊ नये.
या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच विलास अण्णा सोनवणे यांनी केले प्रास्ताविक जि प सदस्य महेंद्र घोडके पाटील यांनी केले सूत्रसंचालन सचिन दिघे व नामदेव कहांडळ यांनी केले तर विलास मास्तर सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिक कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.