मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध

संगमनेर – सध्या खरीप हंगाम सुरू तालुक्यातील बहुतांश पेरणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना युरियाची मोठी अडचण निर्माण झाली आहे . शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला सूचना केल्यानंतर आज कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला बफर स्टॉक मधील 50% युरिया तातडीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याला सरकारने सातत्याने मदत केली पाहिजे ही भूमिका माजी मंत्री थोरात यांनी कायम मांडली आहे.

शेतकऱ्यांना आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत असून अनेकदा चांगली पिके असूनही भाव मिळत नाही. शासनाने हमीभाव जाहीर करू असे अनेकदा सांगितले मात्र हमीभाव दिलेला नाही. शेतकरी हा कायम संकटात आहे .त्याला शासनाने काय मदत केली पाहिजे ही भूमिका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची राहिली आहे. याचबरोबर महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा केली होती. ती कर्जमाफी ही तातडीने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला व सरकारला राज्यातील शेतकऱ्यांना व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना बफर स्टॉक मधून 50% युरिया उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिले होते. या मागणीचा विचार करून कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना 50 टक्के युरिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात
    महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी कृषिमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी गौरवास्पद कामगिरी केली असून सहा वर्ष राज्याचे कृषिमंत्री पद भूषवताना या कार्यकाळात सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले याचबरोबर शेतकऱ्यांसाठी महापिक अभियान, 1 लाख शेततळी, विद्यापीठे बांधावर असे अनेक सातत्याने उपक्रम राबवले असून कृषी खात्यामध्ये त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामामुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय कृषी मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाची नोंद आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची विन अट कर्जमाफी देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सर्वाधिक पुढाकार राहिला असल्याचे प्रगतशील शेतकरी रमेश गुंजाळ (खांडगाव) यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *