निळवंडे धरणातुन १५ जुलैपासून दोन्ही कालव्यांना ओव्हफ्लोचे पाणी सोडणार

  • आमदार अमोल खताळ यांच्या पत्रानंतर जलसंपदा मंत्र्यांनी दिले निर्देश

संगमनेर तालुक्यातील जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणात मागील काही दिवसात झालेल्या पावसाने मोठा पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने निळवंडे धरणातून ओव्हफ्लोचे पाणी डावा आणि उजवा कालव्यामध्ये सोडण्यात यावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती .त्यांच्या मागणीचा विचार करून १५ जुलै २०२५ पासून निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याबाबतचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला निर्देश दिले आहेत.

भंडारदरा आणि निळवंडे धरणात मोठा पाणी साठा उपलब्ध होत असला तरी संगमनेर तालुक्यात पाहीजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीपाच्या पीकांवर संकट येण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यात सोडले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, तसेच नदी काठच्या गावांतील पाणीपुरवठा योजनांना सुद्धा या पाण्याचा फायदा होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल. त्यामुळे जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने दोन्ही कालव्यांना सोडण्याचा निर्णय करून तालुक्यातील शेतकर्याना न्याय द्यावा अशी लेखी मागणी आमदार खताळ यांनी जलसंपदा मंत्री विखे यांच्याकडे ७ जुलै २०२५ रोजी केली होती.


आमदार खताळ यांनी केलेल्या मागणीचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचार करून १५ जुलैपासून वरील दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिले आहे त्यामुळे निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *