संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील कृषी सेवा केंद्राच्या घरफोडी गुन्हयातील 3 आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दि.15/05/2025 रोजी फिर्यादी संदीप पोपट गिते, रा.पिंप्रीलौकी, ता.संगमनेर हे त्यांचे कृषी सेवा केंद्र बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपीतांनी त्यांचे दुकानाचा पत्रा उचकटुन त्यामधील माल घरफोडी चोरी करून चोरून नेला. याबाबत आश्वी पोलीस स्टेशन गु.र.नं.104/2025 बीएनएस कलम 331 (1), 305 (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. मा.पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्हयातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, मयुर गायकवाड, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक नेमुण घरफोडी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.दिनांक 21/05/2025 रोजी पथक वर नमूद घरफोडीच्या गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना तीन इसम हे त्यांचेकडील पीकअप गाडी क्र.एमएच-21-बीएच-5443 मधुन अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणारे रोडलगत आशिर्वाद मंगल कार्यालयाजवळ शेतीचे औषधे संशयास्पद विकत असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन पंचासमक्ष 1) गणेश विठ्ठल आव्हाड, वय 23, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, अहिल्यानगर 2) राज संदीप गायकवाड, वय 24, रा.विळद, ता.अहिल्यानगर 3) आदित्य संतोष इंगोले, वय 23, रा.गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, ता.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.पथकाने आरोपीचे ताब्यातील पीकअपची पाहणी केली असता त्यामध्ये शेतीचे औषधे व रसायन मिळून आले.पथकाने पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातुन 8,57,392/- रू किं.त्यात महिंद्रा कंपनीचा पीकअप, शेतीचे कीटकनाशक, औषधे व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.


ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी दि.16/05/2025 रोजी पहाटे पिंप्रीलौकी फाटा, शिबलापूर, ता.संगमनेर येथून एका कृषी सेवा केंद्राचा पत्रा उचकटुन चोरी केल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह आश्वी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास आश्वी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


सदर कारवाई मा.श्री.राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, व मा.श्री.कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
(प्रतिनिधी – शुभम पाचारणे, अहिल्यानगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *