संगमनेर – गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शहरातील पंचायत समिती परिसरातील श्री अश्वेश्वर महादेव हिंदू मंडळ व आमदार अमोलभाऊ खताळ प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी येथे साई दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी आयोजित महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ यांनी सहभागी होतं भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.

गुरु पौर्णिमेनिमित्त दरवर्षी हजारो भाविक शिर्डी येथे पायी दर्शनासाठी जात असतात. हे भाविक शहरातील दिले नाका, पंचायत समिती परिसरातून शिर्डी येथे जात असतात. या भाविकांसाठी पंचायत समिती, दिल्ली नाका परिसरातील श्री अश्वेश्वर महादेव हिंदू तरुण मित्र मंडळ आणि आमदार अमोल खताळ प्रतिष्ठान यांच्यावतीने महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या मंडळाच्यावतीने पंचायत समिती परिसरात शिर्डी येथे साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नीलमताई खताळ, भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पायल ताजणे आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.. याप्रसंगी मंडळाचे शिवम गुंजाळ, विलास घुगे लालू गुंजाळ, निलेश गाडेकर, दीपक वाघमारे, प्रदीप गुंजाळ, सौरभ गुंजाळ, आदित्य नवले, सागर घुगे, प्रदीप राजपूत, हेमंत गाडेकर, निखिल धुमसे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .