- नवीन लोकप्रतिनिधीच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
भोजापुर धरणातून संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी मिळावे यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम पाठपुरावा केला असून त्यांनी केलेल्या चाऱ्यांमधूनच आज या भागांमध्ये पाणी आले आहे. निमोण व परिसरातील सर्व गावांमध्ये साखळी बंधारे आणि नालाबडिंग हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केली आहे. दरवर्षी हे बांधारे भरल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. आलेले पाणी यामध्ये नवीन लोकप्रतिनिधीने कोणतेही योगदान नाही . प्रत्यक्ष काहीतरी काम करा मग बोला तुमचे या चारीच्या कामांमध्ये योगदान काय असा परखड सवाल बी आर चकोर आणि अनिल घुगे यांनी विचारला आहे.


भोजापुर धरणातून आलेल्या पाण्याबाबत प्रसिद्धी पत्रकात बी आर चकोर यांनी म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भोजापुर धरणातून निमोन, पळसखेडे, क-हे, पिंपळे, सोनेवाडी यांसह पारेगाव, नान्नज दुमाला ,काकडवाडी ,चिंचोली गुरव या गावांना पाणी मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून भोजापुर चारी वटमाई डोंगरापर्यंत व पुढे तळेगावमाथा इथपर्यंत चारी तयार करण्यात आली . याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी सिमेंट बंधारे व नालाबर्डिंग यांची साखळी तयार त्यामुळे आलेल्या ओहर फ्लोच्या पाण्यातून ही सर्व बांधारे भरली जातात. आणि नागरिकांना याचा लाभ होतो. भोजापुर चारीच्या कामामध्ये कारखान्याचे मोठे योगदान आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही चारी जलसंधारण विभागाकडे वर्ग केली . जलसंधारण विभागाकडून मोठा निधी मिळवून चारीची दुरुस्ती व रुंदीकरण केले. यामुळे निमोन व परिसरात या भोजापुरचे पाणी दरवर्षी येते. इतर गावांना देण्यासाठी कारखाना यंत्रणा दरवर्षी काम करते. हे सर्वश्रुत आहे
यावर्षी लवकर चांगला पाऊस झाल्याने भोजापुर धरण भरले असून ओहर फ्लो चे पाणी चारी मधून पाणी सोडण्यात आले. जे दरवर्षी नियमितपणे होते. यामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी यांचा काय संबंध असा सवाल विचारताना जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री असताना या कालव्याकर्ता कोणतीही तरतूद अद्याप झालेली नाही. फक्त नव्या लोकप्रतिनिधीची भाषणबाजी सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून हे करू पालकमंत्र्यांच्या माध्यमातून ते करू तुमच्या माध्यमातून काय करणार ते सांगा.
जे काम झाले आहे. ते जनतेला माहिती आहे. तुम्ही काय करणार ते सांगितले पाहिजे. पाणी जास्तीत जास्त भागांमध्ये नेण्याचे स्वप्न माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची आहे. सत्ता ही महायुतीची असल्याने तुम्ही याबाबत पाठपुरावा केला तर जनतेला आनंदच आहे. मात्र आलेले पाणी हे नवीन लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री यांचा कोणताही संबंध नाही. विनाकारण श्रेय घेऊ नये .तसेच जनतेमध्ये दिशाभूल करू नये असेही त्यांनी म्हटले असून महायुतीचे अनेक कार्यकर्ते फक्त सोशल मीडियामध्ये काम करत आहे. आम्ही मात्र प्रत्यक्ष काम करत आहोत. येणारा काळच ठरवेल की सोशल मीडियावर बोलणारे हे जनतेच्या कामाचे नाही असेही त्यांनी सांगितले आहे . याचबरोबर हे पाणी पूजन करून देखावा केल्याबद्दल निमोन परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
- पाच गावांना ग्रॅव्हिटी द्वारे पाणी
संगमनेर शहराला निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन द्वारे ग्रॅव्हिटी द्वारे पाणी मिळत आहे. हीच संकल्पना मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निमोण प्रादेशिक योजनेसाठी वापरली असून या योजनेमधून निमोन, पळसखेडे,क-हे,सोनेवाडी व पिंपळे या पाच गावांना ग्रॅव्हिटी द्वारे पाणी मिळत असल्याचे युवक काँग्रेसचे सरचिटणीस गोरख घुगे यांनी म्हटले आहे.