- सोमेश्वर मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी रोशन आमले
संगमनेर शहरातील मानाचा गणपती असलेल्या रंगार गल्ली येथील सोमेश्वर मित्र मंडळाच्या कार्यकारणीवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड झाली असून या सर्वांचा सत्कार महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला असून अध्यक्षपदी रोशन आमले यांची निवड झाली आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे सोमेश्वर मित्र मंडळाच्या नवीन कार्यकारिणीचा सत्कार मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, मार्गदर्शक किशोर पवार, आप्पासाहेब खरे मुकुंद गरुडकर कैलास लोणारी अनिल काळन अभिजीत पाटणकर उपस्थित होते.
नवीन कार्यकारणीमध्ये अध्यक्षपदी रोशन अनिल आमले, उपाध्यक्षपदी अक्षय ढोरे व अमोल डुकरे,सचिव संकेत राजेंद्र काजळे, खजिनदार देवेंद्र काळे,कैलास बोरसे,सदस्य शुभम आमले, योगेश काजळे, वैभव आमले, प्रसाद आमले,रोहित बोरसे,श्रीराज गोंगे,शुभम परदेशी, अमित बोरसे, कुंजन कांबळे, कमलेश असावा,निखिल डुकरे, सोनू भिंगरे,मयूर जाधव,साईराज शेरे, साईराज पाटणकर,कृष्णा असावा, शंतनू नावले, ओम परदेशी, परिश्रम काळंन,सार्थक मिसाळ, विनायक भोईर, स्वाती मिसाळ, ओम कांबळे, अकबर चौधरी,नरेंद्र बोरसे,सचिन लोणारी आदी उपस्थित होते.
यावेळी माजीमंत्री थोरात म्हणाले की, सोमेश्वर मित्र मंडळाचा गणपती हा मानाचा गणपती आहे. संगमनेर शहरांमध्ये अत्यंत सलोख्याने आणि आनंदाने तरुण एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. सर्वधर्मसमभाव आणि सर्वांना सामावून घेण्याची आपली परंपरा असून यापुढील काळातही सोमेश्वर मित्र मंडळ आपली ही समृद्ध परंपरा जपत संगमनेर शहराच्या वैभवात आणखी भर घालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर किशोर पवार म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर मित्र मंडळाने आपली वैभवशाली परंपरा जपली असून महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेमध्ये संगमनेरच्या सर्व गणेश मंडळांना सामावून घेतले आहे. नवीन पदाधिकारी माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात,सौ.दुर्गाताई तांबे, माजी उपनगराध्यक्ष किशोर पवार, आप्पासाहेब खरे,मुकुंद गरुडकर, कैलास लोणारी,अनिल काळन,अभिजीत पाटणकर यांनी अभिनंदन केलं आहे.