मेजर संदीप घोडेकर यांच्या रूपाने देशभक्त हरपला – आमदार अमोल खताळ

संगमनेर शहरातील घोडेकर मळा येथील मेजर संदीप घोडेकर यांच्या जाण्याने संपूर्ण संगमनेर गावावर शोककाळा पसरली आहे. त्यांनी CRPF जवान म्हणून जम्मू व काश्मीर, छत्तीसगड, दिल्ली येथे अत्यंत उत्कृष्ट सेवा केली. कर्तव्यावर असताना त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ही बातमी मला समजताच खूप वाईट वाटले. मात्र मी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त मुंबईत असल्यामुळे अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहू शकलो नाही याची मला खंत आहे.

माझी पत्नी नीलम खताळ यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून पुष्पचक्र अर्पण केले आहे. मी आणि माझा परिवार घोडेकर परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या अकाली निधनाने संगमनेरची फार मोठी हानी झाली आहे ती कधीच भरून न येणारी आहे अशी भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.

  • मेजर घोडेकर परिवाराच्या दुःखात खताळ परिवार सहभागी – नीलम खताळ

देशाच्या रक्षणासाठी प्राणपणाने काम करणारे जवान संदीप घोडेकर यांच्या अकाली निधनाने संगमनेरची फार मोठी हानी झाली आहे. कायमच ते आमच्या स्मरणात राहतील. नक्षलग्रस्त छत्तीसगड सारख्या ठिकाणी त्यांनी अनेक वर्षे सेवा दिली. त्यांच्या कार्याचा आम्हाला सदैव अभिमान आहे. त्यांच्या अकाली निधनाने घोडेकर कुटुंबीय आणि परिवारावर जो दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आमदार अमोल खताळ व आमचा खताळ परिवार सहभागी आहे. या दुःखातून त्यांना सावरण्याची ताकद मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्यासह सर्व संगमनेरकर त्यांच्या दुःखात सहभागी आहोत अशी भावना नीलम खताळ यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *