देशाची परंपरा टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधन करण्याची गरज – आ.बाळासाहेब थोरात

आपल्या देशामध्ये विविध जाती धर्मामध्ये अनेक मोठ मोठे संत होऊन गेले. वारकरी संप्रदायाला मोठी समृद्ध परंपरा असून सर्वांनी सर्व धर्म समभाव व एकात्मता जपत मानवतेचा हाच खरा धर्म ही संतांची शिकवण असल्याचे सांगितले आहे असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. वसंत लॉन्स येथे वारकरी संवाद मेळाव्या निमित्ताने ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार आ.डॉ सुधीर तांबे, दत्तात्रय महाराज भोर,सुनील महाराज मंगळापूरकर,सुदाम महाराज कोकणे,डॉ.जयश्रीताई थोरात, व्यंकटेश महाराज सोनवणे, रोहिदास महाराज बर्गे,बाळकृष्ण महाराज करपे, जयश्रीताई तिकांडे, सिताराम राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.थोरात पुढे म्हणाले की, देशामध्ये अनेक जातीवाद होतांना आपण पाहत आहे. परंतु संतांनी कायम सर्व समाजाला समानतेचा संदेश देण्याचे काम केले. आजही वारकरी संप्रदाय हे सर्व धर्म समभाव, समानता म्हणून ज्ञानदान करण्याचे काम करत. ज्याचे त्याचे काम प्रत्येकाने प्रामाणिक करावे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कायम विकासाचे राजकारण केले पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. मी माझ्या 40 वर्षाच्या राजकारणात कधी चुकीचे. सुडाचे राजकारण केले नाही. वेळप्रसंगी विरोधकांना सुद्धा मदत केली.


सध्या देशामध्ये जे राजकारण चालू आहे. ते काळजी करण्यासारखे आहे. देशाची परंपरा टिकवण्यासाठी वारकरी संप्रदायाने आता समाज प्रबोधन करण्याचे काम करावे लागेल. राजकारण्यांनी राजकारण करताना पातळीत राहून बोलले पाहिजे. माझ्या जिवनात निळवंडे धरणाचे काम पूर्ण करण्याचे सर्वात मोठे भाग्यच आहे. या कामाने शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.
आपण पाहतो सध्याचे युती सरकार सर्व भ्रष्टाचाराच्याना एकत्र घेऊन जातीपातीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. परंतु महाराष्ट्र कायम सूडबुद्धीच्या राजकारणाच्या विरोधात असतो. हे येणाऱ्या 23 तारखेला कळेलच तालुक्यामध्ये कायम विकासाचे राजकारण करताना आपल्या सहकारी संस्था प्रगतीपथावर ठेवले आहे. म्हणून संगमनेरची बाजारपेठ फुललेली असते. आमच्या घराण्याची परंपरा ही वारकरी संप्रदायाची असल्याचे ते म्हणाले.


डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, वारकरी संप्रदाय हा माझा आवडीचा विषय आहे. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये लहान मोठे हा भेदभाव कधीही नसतो. म्हणूनच परंपरा कायम टिकून आहे.
दत्तात्रय महाराज भोर म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सहकाराची देशाने नोंद घेतली आहे. अशा स्वच्छ व प्रामाणिक नेतृत्व आम्हाला लाभले आहे. म्हणून सर्व वारकऱ्यांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला आहे. संगमनेर तालुक्याचे नेतृत्व उद्या महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन एकत्र येऊन काम केले पाहिजे.
दरवर्षी वारकरी संवाद मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. यामधून विषयाचे देवाण – घेवाण होणार आहे. यावेळी संगमनेर अकोले सह विविध तालुक्यांमध्ये वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *