आमदार बाळासाहेब थोरात हे जनतेच्या मनामनात – आमदार सत्यजित तांबे

संगमनेर तालुका हा परिवार मानून मागील अनेक वर्ष एकही दिवस विश्रांती न घेता या तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या विकासाकरता सातत्याने काम करणारे आमदार बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्यातील जनतेच्या मनामनात असल्याचे गौरवोद्गार सत्यजित तांबे यांनी काढले असून या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने आमदार थोरात यांना विजयी करून महाराष्ट्रात नवा मापदंड निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी व राजापूर येथील विविध नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी समवेत सिताराम राऊत नवनाथ आरगडे यांसह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला विकासातून वैभवाकडे नेले आहे.
चाळीस वर्षांपूर्वी दुष्काळी असलेल्या संगमनेर तालुका आज राज्यातील सर्वात प्रगत तालुका म्हणून ओळखला जात आहे. ते येथील नेतृत्वामुळे. 110 किलोमीटर लांबीचा संगमनेर तालुका 171 गावे आणि 258 वाड्यावर त्या असूनही प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण, शेती ,ग्रामीण विकास यामधून तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे.
संपूर्ण संगमनेर तालुका परिवार मानताना प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सातत्याने सहभागी होत आहेत. आमदार थोरात यांचे जनतेवर प्रेम आहे. आणि येथील जनतेचे आमदार थोरात यांच्यावर प्रेम आहे. हे अतूट नाते आहे. कुटुंबप्रमुख म्हणून तालुक्यातील प्रत्येकाला आमदार थोरात यांचा सार्थ अभिमान असून राज्य पातळीवर त्यांच्या नेतृत्वाचा होणारा गौरव हा प्रत्येकासाठी अभिमानास्पद ठरणार आहे.


अनेक लाटा आल्या ,गेल्या, मात्र संगमनेर तालुक्यातील जनता ही आमदार थोरात यांच्या पाठीशी उभी राहिली.आणि तालुक्यावर ज्या ज्या वेळेस संकट आले .त्या त्या वेळेस आमदार थोरात प्रत्येक संकटात जनतेच्या मदतीत उभे राहिले. कोरोना संकट असेल पूर परिस्थिती असेल अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमदार थोरात हे कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका बजावत होते.
सर्वधर्मसमभाव ,सर्वांना समान संधी आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास होण्याकरता राजकारण ही येथील संस्कृती आहे. बाह्य शक्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु खालच्या पातळीवर जेव्हा टीका झाली तेव्हा संगमनेर तालुका एकवटला आणि तालुक्याची अस्मिता जागी झाली. तेव्हा विरोधकांना पळता भुई थोडी झाली. असे सांगताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतून संगमनेर तालुक्यातून विक्रमी मताधिक्याचा मापदंड निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने काम करा असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *