पळसखेडेची अक्षदा पवार जिल्ह्यात दुसरी, वक्तृत्व स्पर्धेत चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा 2024-25 रेसिडेन्शियल हायस्कूल अहिल्यानगर येथे पार पडल्या यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडे येथील इयत्ता सहावीची विद्यार्थीनी अक्षदा दिपक पवार हिने किशोर गटातील वक्तृत्व स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. करूया वृक्षसंवर्धन.. फुलवूया नंदनवन… हा विषय घेवून वृक्षांचे महत्व , वृक्षसंवर्धन काळाची गरज याचे महत्व सांगितले.


किशोर गटातील वक्तृत्व स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यातील प्रथम क्रमांक आलेले विजेते स्पर्धक सहभागी झाले होते. 14 स्पर्धकांपैकी पळसखेडे येथील अक्षदा दिपक पवार हिने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला. अक्षदाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता जाधव, शिक्षक राजेंद्र कडलग ,प्रदिप अनाप,संपत दरेकर , योगिता दिघे, शोभा मंडलिक, अर्चना भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, विस्तार अधिकारी कल्याण राऊत, केंद्रप्रमुख अशोक आवारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक कांडेकर, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ पळसखेडे यांनी अक्षदाचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *