अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षका सुमन गणपत खतोडे यांचा गुणगौरव सोहळा पालकांनी आयोजित केला. त्यामध्ये विध्यार्थी व पालक यांनी शिक्षिकेला चक्क स्कुटी दुचाकी भेट दिली आहे.
अकोले येथे आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. किरण लहामटे यांचे हस्ते व राजूर महाविद्यालय चे माजी प्राचार्य विलास नवले यांच्या अध्यक्षतेखाली केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष श्री के. डी. धुमाळ, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी अकोले माधवराव हासे, शिक्षण विस्तार अधिकारी मवेशी बीट बाळासाहेब दोरगे, केंद्रप्रमुख नवलेवाडी सुनील नरसाळे, शिक्षक श्री विक्रम गायकर यांच्या उपस्थितीत इयत्ता चौथीचे सर्व विद्यार्थी व पालक आणि शिक्षक वृंद नवलेवाडी यांनी या गौरव सोहळ्याचे आयोजन केले.


नवलेवाडी शाळेत चौथीच्या विध्यार्थ्यांच्या शिक्षका श्रीमती सुमन गणपत खतोडे यांच्या शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीने व विध्यार्थ्यांना आपलेसे करण्याने तसेच त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाने व मेहनतीने इयत्ता चौथीतील सर्व मुलांनी जिल्हास्तर व राज्यस्तरावर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नाविन्यपूर्ण यश मिळविले. अनेक विध्यार्थी यशाचे मानकरी ठरले त्यामुळे सर्व पालकांनी त्यांना ज्युपिटर स्कूटी भेट दिली.
आमदार डॉ किरण लहामटे यांनी या विध्यार्थी प्रिय शिक्षकेच कौतुक केले. चांगल काम केल तर पालक पण शिक्षकांचा गौरव करतात अस अनोख उदाहरण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता सहाणे यांनी केले तर सत्कारमूर्तींचा परिचय आणि ओळख कविता आरोटे यांनी करून दिली. तसेच आलेल्या पाहुण्यांचा सत्कार डॉ. निलेश सहाणे यांनी केला तर आभार प्रदर्शन महेश शेटे यांनी केले. कार्यक्रमासाठी सचिन वाकचौरे, सचिन पापळ, अमोल वाकचौरे, संतोष कडलग पालकांनी सहकार्य केले.