छत्रपती शिवरायांच्या विचारातून मोदी सरकारचे कार्य – आमदार शरद सोनवणे

छत्रपती शिवरायांच्या हिंदुत्ववादी विचारातून देशाचे पंतप्रधान मोदी काम करत आहे यामागे शंकरजी गायकरांसारखे अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे कार्य दडलेले आहे असे गौरवोद्गार जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी काढले.
ब्राम्हणवाडा येथे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री व राष्ट्रीय प्रवक्ते शंकर भाऊराव गायकर यांनी द्वितीय नर्मदा माता पायी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली. या पवित्र कार्याच्या सांगतेनिमित्त भव्य व भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महामंडलेश्वर बाळानंद महाराज कोंडार, अकोलेचे माजी आमदार वैभवराव पिचड, संगमनेरचे आमदार मा. अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलमताई खताळ, श्रीक्षेत्र शिवशक्ती गड, तुळजवाडी ह.भ.प. संतोषानंद महाराज, पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीनजी दिनकर, सितारामजी भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, मोहित ढमाले, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, भाजपा मंडल अध्यक्ष राहुल देशमुख, वाल्मिक नवले, बाळासाहेब सावंत, माजी उपसरपंच भारत आरोटे, ॲड. के. बी. हांडे, गोकुळ आरोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सचिन आरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


आ. सोनवणे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला त्यावेळेस मोगल सत्ता त्यांना हसत होत्या परंतु स्वराज्य घडवलं आणि औरंगजेबाला याच मातीत गाडलं तसंच कार्य अटलजी आडवाणी यांनी रथयात्रा काढली त्यावेळेस 70 टक्के देश त्यांना हसत होता मात्र त्या वेळी दिलेले आश्वासन मोदीजींनी पूर्ण केली भव्य राम मंदिर उभारले 370 कलम हटवले यासाठी अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपले जीवाचे बलिदान दिले अशीच प्रेरणा शंकरजी गायकर यांनी आपल्या आयुष्यात जपली असे गौरव उद्गार काढले.
आ. वैभव पिचड यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदीजींनी सिंदूर ऑपरेशन केले. धर्म विचारून मारणारे दहशतवादी आहेत. आज हिंदुत्व विचार पसरत आहे यामागे शंकरजी गायकरांसारखे अनेक व्यक्तिमत्त्वांचा त्याग आहे. निलम ताई खताळ या बोलताना म्हटल्या की, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही देव आणि धर्म वाचविण्यासाठी मतदान करा अशी विनंती केली आणि हा मुद्दा मतदारांना भावला एक आदर्श शक्ती जीवनात पाठीमागे असते अशी नेहमी वाटत होत ती आदर्श शक्ती आज समोर आली. संगमनेर मध्ये हिंदुत्वाचे मुद्द्यासाठी काम करण्याची गोळी त्यांनी दिली.

जिल्हा परिषद गटनेते जालिंदर यांनी बोलताना म्हटले की, आज भारत देशात जे हिंदुत्वाचे वातावरण तयार झाले आहे त्यामागे विश्व हिंदू परिषदेचा मोलाचा वाटा असून यामध्ये राष्ट्रीय महामंत्री म्हणून शंकरजी गायकर यांचा कार्य अनमोल आहे.
ह भ प संतोष आनंद महाराज खताळणी नर्मदा परिक्रमेचे महात्म्य सांगितले तसेच शंकरजी गायकर यांनी नर्मदा परिक्रमेत दोन वेळा कसे वाचले हा प्रसंग सांगितला त्यांच्या या भाषणातून अंगावर रोमांच उभे राहिले
स्वागत पांडुरंग गायकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रदिप भाटे यांनी तर आभार बाळासाहेब गायकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथर्व गायकर, किरण गायकर यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाची सुरुवात वाजता नर्मदा जलपूजनाने व श्री हनुमंतराय अभिषेकाने झाली. कन्यापूजनाचा दिव्य व मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावाने भरलेला होता. भाविकांच्या मनात अध्यात्म, श्रद्धा आणि संस्कारांची प्रेरणा जागवणारा हा सोहळा अनेकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला.

(प्रतिनिधी – नवनाथ गाडेकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *