पैसा झाला मोठा…भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वे गावात ग्रामसभेत राडा, मागावर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह… आरोपांच्या फैरींत जोर्वे ग्रामसभा गाजली

संगमनेर – संपूर्ण गाव एकत्र एकवटले असताना आदिवासींचा निधी यांचा विविध विकास कामांचा निधी नेमका कुठे गेला असे अनेक प्रश्न विचारले असताना विखे समर्थक सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर न देता त्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामसभेमध्ये मोठा राडा झाला.
जोर्वे येथे ग्रामसभा होती, परंतु ती ग्रामसभा गाजली काही विशिष्ट कारणांनी सामान्य जनता आपल्या कष्टाचा पैसा कर स्वरूपात सरकारला देत असते, व त्यातीलच काही निधी सरकार ग्रामपंचायतीला गावाच्या विकासासाठी देत असते, आज जोर्वे गावात गेली अडीच वर्ष या निधीचा संपूर्णपणे गैरवापर होत असल्याने, जाब विचारण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते , परंतु सरपंचांकडे याचे उत्तरच नसल्याने सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारांना विचारणाऱ्यांनाच दम देणे ,धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू झाले ,एकीकडे पंचक्रोशीत सांगायचे आम्ही विकास कामांची डोंगर उभे करत आहोत, परंतु त्याच वेळेस जेव्हा एक एक करून अनेक घोटाळे बाहेर निघायला सुरुवात झाली, त्यावेळेस मात्र ते हमरीतुमरीवर आले.


प्रश्न विचारणाऱ्याची गच्ची पकडणे लोटून देणे, लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, असे प्रकार सुरू झाले, पण सामान्य जनतेला ज्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित होते, ते एकही उत्तर भेटले नाही , ग्रामसेवकांनाही जे काही प्रश्न विचारण्यात आले त्याचे उत्तर त्यांना देता येत नव्हते, लाखो रुपयांचा गावात भ्रष्टाचार झाला, परंतु झालेल्या भ्रष्टाचाराची उत्तरे सरपंचांनाही व ग्रामसेवकांनाही देता येत नव्हती, शेवटी ग्रामस्थांनी सर्वच सदस्यांना धारेवर धरले तर उपसरपंच व सदस्यांनीही त्यांची हतबलता बोलून दाखवली , व सांगितले ह्या ग्रामपंचायतीत कोणत्या गोष्टी खरेदी केल्या जातात व कोणाला दिले जातात हे आम्हालाच कळत नाही, कोणता निधी कुठे वापरला जातो हेही कळून दिले जात नाही, गावात ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आलेला निधीही परस्पर दुसरीकडे वळवला जातो, वेगळाच माणसाच्या नावाने अकाउंट काढून त्यावर निधी वर्ग काढून तोही पैसा लंपास केला जातो, छोट्या छोट्या कामांचे मोठ मोठी बिले काढण्यात येतात..


हे ऐकून सर्वच जनता अवाक, झाली.जोर्वे गावात गेली 40 वर्ष जे कधीही घडले नाही, असा प्रकार आज घडत होता, शिव्या , भांडणे मारामाऱ्यानी संपूर्ण गाव हादरून गेले, युवा पिढी थोड्याशा प्रलोभनांना बळी पडून असे वागत असेल, तर भविष्य अवघड आहे, असे गावातील ज्येष्ठ मंडळींनी बोलून दाखवले. यावेळी सुरेश थोरात,सत्यजित थोरात हर्षल काकड, उपसरपंच बादशहा बोरकर,संजय थोरात, संपत थोरात, मुकेश काकड, राहुल बोरकर,भाऊसाहेब दिघे, बालम भवर, माणिकराव यादव, राजू थोरात, रमेश दिघे, अक्षय दिघे, विठ्ठल काकड, पंढरीनाथ बलसाने, गगन थोरात, डॉ. पवन काकड, अजित थोरात, शुभम दिघे, शांताराम दिघे, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, कैलास क्षीरसागर,जीवन काकड, ऋषिकेश थोरात, बाळासाहेब काकड, संदीप यादव,दत्तू नाना काकड.शुभम दिघे, व इतर ग्रामस्थ यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने त्यांनी गोंधळ घातला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *