वारकरी संप्रदाय हा समतेची व त्यागाची शिकवण देणारा – डॉ जयश्रीताई थोरात

वारकरी संप्रदाय हा अध्यात्मिकते बरोबरच समतेची व त्यागाची शिकवण देणारा आहे. आपण सर्वच जण विठ्ठलाला मानणारे असून वारीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक वेगळाच सात्विक अनुभव येत असल्याचे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.


तालुक्यातील मनोली येथे मनोली ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान प्रसंगी त्या उपस्थित होत्या. यावेळी दिंडी चालक राधाकिसन शिंदे, सुखदेव शिंदे यांसह बाळासाहेब शिंदे मोठ्या भाऊ शिंदे ,विठ्ठल शिंदे ,विलास क्षीरसागर, प्रभाकर बेंद्रे ,गंगाधर चव्हाण, काशिनाथ साबळे, वसंत शिंदे ,नारायण भागवत, निवृत्ती ठोसर ,अरुण जोंधळे, रघुनाथ रिंगे , पुंजाबाई साबळे, शंकर शिंदे, बारकू ठोसर ,भास्कर शिंदे, रावसाहेब शिंदे, लहान भाऊ गाडेकर, साहेबराव ठोसर, एकनाथ पराड, विठ्ठल गोराणे, सोमनाथ थोरात, गणेश भवर ,गीताराम शिंदे ,मच्छिंद्र शिंदे , जितेंद्र शिंदे, आबाजी साबळे ,अण्णासाहेब साबळे यांसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, वारकरी संप्रदायांनी संपूर्ण देशाला एकतेची, समानतेची आणि त्यागाची शिकवण दिली आहे. पंढरीच्या वारीतून प्रत्येक वारकऱ्याला एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा मिळत असते. वारकरी हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक किलोमीटर पायी चालत जातात अशी ओढ खऱ्या भक्ती भावाचे प्रतीक आहे. तालुक्यातील मनोली गावाने पंढरपूर पर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहे.
यावेळी दिंडी चालक बाळासाहेब शिंदे म्हणाले की, मनोली ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा असणार आहे. यात सर्वजण विठ्ठलाच्या भक्तीत एकरूप होणार असून यातून प्रत्येकाला वेगळाच अध्यात्मिक आनंद मिळणार आहे. यावेळी परिसरातील भाविक, भक्त वारकरी ,नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *