संगमनेर – शासन गावागावातील शेत, पाणंद रस्ते खुले करण्यासाठी प्राधान्य देत आहे मात्र राजकीय सुडभावनेने चंदनापुरीच्या सरपंचांनी कोणतीही परवानगी न घेता पूर्वीपार शेतात जाणारा रस्ता मनमानी, दादागिरी आणि दमदाटी करून बंद केला. तो तात्काळ खुला करून देण्यात यावा अशी मागणी परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी संगमनेर उपविभागाचे प्रांत आधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनातुन केली आहे.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील पूर्वी पार असणारा शेतीत जाणारा रस्ता सरपंचांनी मनमानी व दादागिरी, दमदाटी करून बंद केला त्यामुळे तेथील बाधित शेतकऱ्यांनी रस्त्या संदर्भातील प्रश्न शासनदरबारी मांडला आहे. एका बाजूला राज्यशासन शेत, पाणंद रस्ते खुले करण्यासाठी प्राधान्य देत असताना दुसऱ्या बाजूला काहीजण राजकीय सुड भावनेने काम करतायेत. गावचे सरपंच भाऊराव राहणे यांनी ग्रामसभेची कुठलीही परवानगी न घेता जिल्हापरिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू केले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे शेतमाल बाजारात ने आण करता येत नाही.
त्यामुळे या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रशासनाने हा रस्ता तात्काळ खुला करून द्यावा अशी मागणी परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी संगमनेर उपविभागाचे प्रांत अधिकारी अनिल उंडे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करत सरपंचांनी केलेले कृत्य हे जाणीवपूर्वक राजकीय सुडभावनेच्या उद्देशाने केलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आकाश सोमनाथ रहाणे ,रोहित रावसाहेब शिंदे, मीनानाथ रावजी राहणे ,सोमनाथ रावजी राहणे ,अनिल भिमाची राहणे ,अमोल उत्तम राहणे ,कैलास भिमाजी राहणे, राहुल पुंजा राहणे, संजय बबन सातपुते आणि सुनील भीमा राहणे यांनी केली आहे.