संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील माजी सरपंच चिमाजी विठोबा धुळगंड यांचं वयाच्या 78 वर्षी दुःखद निधन झालं.

चिमाजी धुळगंड यांनी सन 1986 काळामध्ये पंधरा वर्षे मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच म्हणून काम पाहिलं, तसेच त्यांनी त्या काळात त्यांचा अनेक सामाजिक कामांमध्ये सहभाग राहिला. त्यांच्या निधनाने संपूर्ण साकुर पठार भागावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या रविवारी १७ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता मांडवे बुद्रुक येथील मुळातीरी शोकाकुल वातावरणात होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं ,एक मुलगी,नातू असा मोठा परिवार आहे.
(प्रतिनिधी – रमजान शेख, साकुर)