ग्रामस्थांच्या प्रयत्नातून जांभुळवाडी स्वतंत्र महसुली गाव – सरपंच अण्णासाहेब कुदनर, ज्यांना गाव माहित नाही  त्यांचा काय संबंध, नवीन लोकप्रतिनिधीने दिशाभूल करू नये

साकुर ग्रामपंचायत मधून जांभुळवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत झाली मात्र त्याला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळावा यासाठी शंकर पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि हे श्रेय गावकऱ्यांचे असून कोणत्याही पुढार्‍याचे नाही . नवीन लोकप्रतिनिधीच्या कार्यालयातून चुकीची बातमी प्रसिद्ध झाली असून त्यांनी खोटी पत्रकबाजी करू नये करू अशी परखड प्रतिक्रिया या कामी पाठपुरावा करणारे सरपंच अण्णासाहेब कुदनर यांनी दिली आहे.


नुकतीच जांभुळवाडी गावाला स्वतंत्र महसुली दर्जा प्राप्त झाला या कामासाठी गावचे सरपंच अण्णासाहेब कुदनर, ॲड देवराम चोरांबले, शिवाजी कातोरे ,विलास डोके, सुभाष कुदनर, गोरख भडकवाड, आसिफ शेख यांसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. या कामी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला व त्यांना तत्कालीन तहसीलदार आणि प्रांत यांनी मोठी मदत केली.
या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून जांभुळवाडी गाव हे स्वतंत्र झाले आहे यापूर्वी या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळण्याकरता तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता स्वतंत्र गाव झाले असून याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. मात्र गावात बातमी येण्यापूर्वीच श्रेय घेण्यासाठी काही लोकांनी परस्पर बातम्या प्रसिद्ध केल्या आहे. ज्यांना गाव माहिती नाही. ज्या पुढार्‍यांचे या गावात कोणतेही काम नाही. त्यांनी कधी आमच्या गावाकडे पाहिले नाही अशी मंडळी आता पत्रक बाजी करून या कामाचे श्रेय घेत आहे. त्यांचा काय संबंध हे कामासाठी आम्ही मागील वर्षी पाठपुरावा केला आणि आम्हाला गावात माहीत होण्याच्या अगोदरच नवीन लोकप्रतिनिधीच्या कार्यालयातून बातम्या प्रसिद्धीला दिल्या गेल्या ही कुठली पद्धत.
अशी खोटी पत्रक बाजी करणे हे अत्यंत चुकीचे आहे. श्रेय गावकऱ्यांचे व एकीचे आहे. कष्ट गावकऱ्यांचे आहे. कोणीही फुकटची प्रसिद्धी करू नये अन्यथा आमच्या गावात येणे आम्ही बंद करू असा इशाराही सरपंच व इतर कार्यकर्त्यांनी दिला आहे.

  • स्वतंत्र गावाच्या कामाशी नवीन लोकप्रतिनिधीचा कोणताही संबंध नाही
    जांभुळवाडी गावाला स्वतंत्र महसुलीचा दर्जा मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. मात्र काही लोकांनी खोट्या बातम्या पसरवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याने गावकरी नाराज झाले असून या कामाचा पाठपुरावा मागील वर्षी झाला असून यामध्ये नवीन लोकप्रतिनिधी कोणताही संबंध नाही .त्यामुळे त्यांनी अशा बातम्या देऊ नये . तुमच्या कामाचा एक तरी कागद दाखवा.अन्यथा अशा फुकट श्रेय लाटणाऱ्यांना गावात येऊ देणार नाही असा इशाराही समस्त गावकरी व तरुणांनी दिला आहे. इशारा मिळतात फुकट श्रेय घेणाऱ्या अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *