संगमनेर – महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे या साधू संतांनी कायमच धर्माविषयी प्रचार-प्रसार केला आहे. मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे या गावामध्ये धर्मासाठी एवढा मोठा कार्यक्रम झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. धर्माचे काम असेल त्या ठिकाणी मी कधीच कमी पडणार नाही आणि हिंदू धर्मासाठी मी तुमच्या मागे कायमस्वरूपी भक्कम उभा राहील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने गेली सात दिवसापासून सुरू असलेल्या शिव पुराण कथेची भक्तिमय वातावरणामध्ये सांगता झाली, त्यावेळी भाविक भक्तांना उपदेश करताना १००८ शिवगिरी महाराज बोलत होते. यावेळी कोपरगाव येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराज यांचे उत्तर अधिकारी टेंबे स्वामी महाराज,आमदार अमोल खताळ, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हरीओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे यांच्यासह इतर सर्वच राजकीय पक्षाचे नेतेगण उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, रामेश्वर परिसराच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून भरीव निधी दिला आहे आणि येथून पुढील काळातही महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले.
शिवगिरी महाराज म्हणाले, पुढील वर्षी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे, या कुंभमेळ्याचा उल्लेख करत, तो प्रया राज कुंभापेक्षाही भव्य होईल अशी अपेक्षा शिवगिरी महाराज यांनी व्यक्त केली.
यावेळी टेंबे स्वामी महाराजांची संगमनेर ते धांदरफळ अशी मोटरसायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले, तसेच संपूर्ण गावातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, तसेच रामेश्वर मंदिरात त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला .ही शिवपुराण कथा यशस्वी करण्यासाठी हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्या सर्व भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.
- हिंदू धर्मियांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घेत हिंदू धर्माची मशाल प्रत्येकाने आपल्या अंतकरणात पेटवून ठेवली पाहिजे .धर्मकार्यामध्ये प्रत्येकाने या शिवपुराण महाकथेचे श्रवण करून आचरणात आणणे गरजेचे आहे . हे धार्मिक कार्याचे व्यास पीठ आहे आणि त्याचे पावित्र्य प्रत्येकाने राखले पाहिजे. तुम्हा सर्वांवर भगवंताची कृपा अखंड अशीच राहावी आणि यांच्या हातून तुमच्या हातून या हिंदू धर्माचे कार्य असेच होत राहो साधू-संतांचे आपल्यावर खूप मोठे संस्कार केले आहे. ते संस्कार प्रत्येकाने जोपासणे गरजेचे आहे.
(महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, मठाधिपती पंचदशनाम जुना आखाडा, त्र्यंबकेश्वर)
- प्रत्येकाने माणसाच्या जन्माला ओळखून कशाप्रकारे राहिले पाहिजे आणि कशा प्रकारे वागले पाहिजे हे ठरविणे गरजेचे आहे परमपूज्य सद्गुरु अण्णा महाराज हे समाजाच्या सेवेसाठी गेली ७० वर्षापासून अहोरात्र चंदनासारखे झिजले अनकापरा सारखे जळाले त्यातून त्यांनी आपणा सर्वांना त्यांच्या आनंदातील आनंद दिला.अन त्यातून आपण घडलो त्यातून काहीतरी कर्तुत्व दिलं आणि त्या कर्तुत्वा तून आपण समाजाचे व त्या परमेश्वराचे काही तरी देणे आहे.असे मानतप्रत्येकाने एकमेकाला समजून घेणं त्याची सेवा करणे गरजेचे आहे माणसाच्या जन्माचा मूळ हेतू आहे परंतु समाज हे कुठेतरी विसरत चालला आहे ही एक मला खंत लागून आहे.
(टेंबे स्वामी महाराज, अण्णा महाराज यांचे उत्तराधिकारी)